रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती (बस्तर) मधील घेतलेला दुर्दांत घटनेचा वास्तववादी शोध

 *सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती (बस्तर) मधील घेतलेला दुर्दांत घटनेचा वास्तववादी शोधदुर्दांत घटनेचा वास्तववादी शोध

जनसंघर्ष समिती, नागपूर



छत्तीसगढ तसे मध्यभारतातील निसर्गसंपन्न राज्य. त्यातीलच बस्तर हे बहुसुंदर क्षेत्र. परंतु, लागलेली किड म्हणूयात की श्राप..! माओवाद्यांच्या क्रूर कृत्याने बस्तर डागाळलं आहे. माओवाद्यांच्या देशविरोधी कृत्यांमुळे इथला आदिवासी समाज आजही विकासापासून कोसोदूर आहे. या दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय यंत्रणा अतोनात प्रयत्न करत आहेत, रस्ते तयार करत आहेत. मात्र, माओवादी त्या सगळ्या प्रयत्नांना भूसुरूंग लावून उध्वस्त करत आहेत. त्यामुळं, पायाभूत विकासासोबत आरोग्य व्यवस्था आदिवासींपर्यंत पोहोचू शकत नसल्याचं चित्र आहे. सर्वात दु:खद गोष्ट म्हणजे, आजही बस्तरमधील अनेक दुर्गम गावांमध्ये आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे माओवाद्यांचा देशविरोधी चेहरा आहे. माओवाद्यांच्या सशस्त्र लाल क्रांतिच्या क्रुरतेपासून सर्वसामान्य आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी छत्तीसगढ पोलिस दल, सीआरपीएफ, बीएसएफच्या तुकड्याही इथे तैनात आहेत. त्यातूनच माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये क्रॉसफायरिंगच्या घटना इथं फारच सामान्य बाब आहे. गेल्या काही काळापासून माओवाद्यांना सुरक्षा दलाच्या मुस्तेदीमुळे बरच नुकसान सहन करावं लागण्यानं त्यांची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे. त्याचा वचपा ते सर्वसामान्यांचं जीव घेऊन काढत आहेत. त्यांच्या या कृत्यातून त्यांचे आक्रस्ताळे रूप प्रदर्शित होत असून, त्यांच्या विकृतीचे दर्शन घडत आहे. अशाच एका घटनेचा शोध घेण्यासाठी आम्ही जनसंघर्ष समिती, नागपूर आणि हेमेंदू रंगभूमी, नागपूरचे सदस्य बस्तरमधील सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती या गावात २९ ऑगस्ट २०२४ रोजी गेलो होतो. नागपूरपासून ५५०-६०० किमी अंतरावर असलेल्या पूवर्तीमध्ये जाणे किती अवघड आहे, याची जाणिव इथे आल्यावरच झाली. पूवर्ती हे गाव सुकमा जिल्ह्यातील अगदी टोकावरचे गाव. त्यामुळे, आम्ही तेथे आधी बिजापूर शहरात पोहोचलो. बीजापूर शहरापासून पूवर्ती हे अंतर ६५-७० किमी इतके आहे. भैरमगढ, उसुर, तर्हेम, दोरनापाल, जागरगोंडा अशा गावांतून जाताना पूवर्ती येथे पोहोचावं लागतं. तऱ्हेम, सिल्गेर, तिम्मापुरमपर्यंत डांबरी रस्ता असल्याने तीथपर्यंत वाहनास कसलीही अडचण आली नाही. मात्र, सुरक्षा दलाचे जागोजागी असलेले कॅम्प आणि जसजसे सिल्गेर, तिम्मापुरमपर्यन्त पोहोचावे, तसतसे त्यांचा वाढता राबता एकीकडे सुरक्षेची हमी देणारे तर दुसरीकडे माओवाद्यांच्या वास्तव्याचे भान देणारे होते. एक गोष्ट इथे अधोरेखित करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे, आम्ही ज्यांना-ज्यांना पूवर्ती गावाचा रस्ता विचारत होतो, त्यांचे चेहरे अचानक चमकून उठत होते. एक प्रकारची धास्तीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. ज्या घटनेचा शोध घेण्यासाठी आम्ही तिथवर पोहोचलो होतो, त्याबाबतही ते टाळल्यागत व्यक्त होत होते.  सिल्गेर-तिम्मापुरम येथील सुरक्षा दलाच्या कॅम्पमध्ये विचारणा केल्यावर पुढचा सगळा अंदाज येऊन चुकला होता. तिथूनच उजवीकडे पूवर्ती गावाचे अंतर साधारणत: ११-१२ किमी इतके आहे. म्हणायला हे अंतर फार नाही. मात्र, इथेच पक्का रस्ता संपतो आणि सुरू होतो भयाण जंगलातला प्रवास. कच्चा रस्ता असल्याने आणि ठिकठिकाणी नदी-नाले वाहत असल्याने वाहन या मार्गाने जाऊच शकत नाही, अशी अवघड स्थिती आहे. त्यामुळे, आम्ही या मार्गाने पायीच जाण्याचा निर्णय घेतला. साधारणत: दिड किमी अंतर पायी चालल्यावर आम्हाला एक गाव सापडले. तेथे गावकऱ्यांशी आम्ही बोलून एखादी बाईक, सायकल मिळते का याची चौकशी करत होतो. मात्र, पुवर्तीमध्ये जायचे म्हटल्यावर एकसारखाच अनुभव! पुवर्ती नाव ऐकताच सगळेच दचकले. त्यांच्या दचकण्यात भीती नव्हती तर कुतूहल होते.  अखेर, मदतकार्य पोहोचवण्यासाठी जातो आहोत म्हटल्यावर अनंत विनंतिनंतर एक ट्रॅक्टर मिळालाच. आम्ही कशासाठी आलो त्याशी त्यांना काही देणेघेणे नव्हते. बस्स, "लेके चलते है" हे त्यांचे वाक्य एकीकडे दिलासा देणारे आणि दुसरीकडे संशय निर्माण कारणारे होते. खरे सांगायचे तर आमच्याकडेही पर्याय नव्हता. अंतर जेवढे वाटले त्यापेक्षा जास्तच होते आणि पायदळ चालणे म्हणजे प्रचंड उशीर आणि सूर्यास्त होऊन चंद्र उजाडण्याचा विषय होता. शिवाय, ट्रॅक्टरच या मार्गांवरचा सच्चा बंदा, हे खरे होते. टेकलगुरम या गावापर्यंत आमचा प्रवास म्हणजे अगदी जंगल सफारीसारखाच होता. याच गावाच्या वेशीवर सीआरपीएफचे कॅम्प आहे आणि तिथेच आम्हाला अडवलं गेलं. आणि इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती झाली. तेथील पाहरेदारान जोरात आमचे सगळे गुपित चव्हाट्यावर आणले आणि आमचा जीव बऱ्यापैकी धोक्यात आला होता. कॅम्प बाहेर असलेले गावकरी आणि ट्रॅक्टरवाला आमच्याकडे वेगळ्याच नजरेनं बघायला लागले होते. अशात कॅम्प मधील वरिष्ठांना ही बाब कळली आणि त्यांनी वेळ साधून नेत सगळी स्थिती वाचाचलाखीनं हाताळली. मात्र, ट्रॅक्टरवाला आता अलर्ट झाला होता आणि तो सोबत येण्यास अजिबात तयार नव्हता. शेवटी कॅम्प प्रमुखांनच त्या ट्रॅक्टरवाल्याला पुवर्ती कॅम्पला नेण्याचे आदेश दिले. सीआरपीएफच्या त्या वरिष्ठ अधिकार्यांकना आम्ही तिथे कशासाठी आलो त्यापेक्षा गावकरण्यांनी आम्हाला दिलेल्या ट्रॅक्टरचे जास्त कौतुक होते. त्याचे कारण म्हणजे, पोलिसांना इथल्या गावांतून कसलीही महत उपलब्ध होत नाही. साधे पाणी पाजले जात नाही, तेथे आम्हाला ट्रॅक्टर मिळाले होते आणि म्हणूनच आम्हीही त्याच्या संशयाच्या भोवर्याात अडकलो होतो. आता त्यांना काय सांगावं की आम्ही कसे कसे तिथवर पोहोचलो ते... तेथून ६ किमी अंतरावर पुवर्ती हे गाव. अत्यंत खोलात असलेलं पुवर्ती हे जहाल माओवादी माडवी हिडमा याचं गाव आणि हेच गाव त्याच्या कुकृत्याचं गढ मानलं जातं. याचा अर्थ गावकरीही माओवादीच आहेत, असं मुळीच नाही. कुऱ्हाड आणि बंदूकीच्या गोळीच्या भितीपोटी नाईलाजाने या क्षेत्रातील अनेक गावकरी त्याला बांधिल झाले आहेत. माडवी हिडमा हा नक्षल्यांच्या (माओवाद्यांच्या) प्लाटून क्रमांक १ चा कमांडर. प्लाटून क्रमांक १ म्हणजे सगळ्यात घातक मानली जाते आणि त्याचा कमांडर म्हणजे माओवाद्यांच्या प्रत्यक्ष कृतींसाठी तोच जबाबदार असतो. एका अर्थाने तोच प्रमुख! कसेतरी पुवरतीला आम्ही पोहोचलो आणि मुसळधार पावसाने जोर धरला. आणि सारेच चिंब भिजलो होतो. अशा दुर्गम जंगली भागात  पावसाचा आनंद न्याराच आणि त्यात भिजणे म्हणजे बातच न्यारी.  पुवर्तीच्या अगदी जवळच रस्ता कामासाठी आणलेला पोकलेन माओवाद्यांनी महिनाभरापूर्वीच जाळला असल्याचे दिसून आले. त्याही पूर्वी महिन्याभरापूर्वीच एक सीआरपीएफ व्हॅन भुसुरुंग स्फोटात नेस्तनाबूत झाल्याचे अवशेष आम्ही बघितले. यात दोन जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. खरे सांगायचे तर हा रस्ता गावकर्यां साठीच बनवायला घेतला आहे. मात्र, माओवाद्यांना विशेषतः कमांडर माडवी हिडमा यालाच नको आहे. कारण, हा रस्ता तयार झाला तर गावकरी शहराकडे धाव घेतील आणि विकास, आरोग्य सेवा जवळ होतील. शिवाय पोलिसांना पुवर्ती हे गाव सहज आणि सोपे होईल.  पुवर्तीला सीआरपीएफ कॅम्प मध्ये पोहोचलो. त्यांना आम्ही आल्याची वार्ता आधीच्या कॅम्पमधून आधीच मिळाली असावी! त्यांनी लागलीच आम्हा सगळ्यांना आत घेतले. चहा-पाणी दिले गेले आणि तेथील प्रमुखांनी आम्हाला आता परत जाने धोक्याचे असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्याकडून सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही पुवर्ती गावात पोहोचलो. तेथे एकही गावकरी आमच्याशी बोलला तयार नव्हता. सारेच संशयाने बघत होते. फोटो, विडिओ घेणे धोक्याचे असल्याचे आधीच कळले होते. त्यामुळे, आम्ही तो शहाणपणा टाळला आणि परतीला लागलो. पुन्हा पुवर्तीच्या सीआरपीएफ कोब्रा कॅम्प प्रमुखांनी आम्हाला थांबण्याचा आग्रह धरला. परंत, आमची गाडी आणि काही सदस्य डांबरी रस्त्यावरील कॅम्पजवळ थांबल्याने त्यांनी काळजी न करण्याचे सांगत, कसलीही अडचण आली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा धीर देत, एक संकेत दिला. “बारीश आपके सुरक्षा के लीये दौड के आयी है। फिर भी कूछ लगे तो हम है। “ आम्ही हसलो, हस्तांदोलन केले आणि परतीला लागलो... पावसाळी नद्या, नाले तुडूंब भरले होते. मात्र, स्थानिक आदिवासी आणि ट्रॅक्टर जिंदाबाद! आम्ही शेवटच्या नाल्यापर्यंत पोहोचलो आणि जे कळले ते भयाण होते. मात्र, काही गोष्टी न संगीतलेल्याच बर्याे असतात. एवढच की एवढ्या धोक्यातूनही आम्ही सहीसलामत बाहेर पडलो आणि घटनेचा खरा बाज बाहेर आणला. थॅंक्स फॉर heavy rain आणि आमचे नशीब!

--------------------------

*सोयम धुरवा सीताराम आणि सोयम शंकर या भावंडांना का मारले?* 

- साधारणत: ७-८ ऑगस्ट २०२४ रोजी पूवर्तीमध्ये माडवी हिडमा याच्याच चिथावणीवरून २५-२६ वर्षीय तरुण ओयम सीतारामची (सोयम धुरवा सीताराम) हत्या माओवाद्यांनी केली होती. त्याचा दोष इतकाच होता की तो त्याच्या गर्भवती पत्नीला वेळेवर उपचार मिळावा, ही त्याची इच्छा होती. ३१ जुलै किंवा १ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळसकाळी सीतारामची पत्नी पडल्याने ती जखमी झाली होती आणि ते शुद्ध हरपण्याच्या स्थितीत होती. दुपारपर्यंत कसलेच उपचार गावात मिळू शकत नसल्याने आणि तेवढी सोय नसल्याने त्याने अखेर पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, ते उपचार पुरेसे नव्हते. तेथील डॉक्टरांनी तिला मुख्य दवाखान्यात नेण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार तीला मोठ्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. परंतु, वाटेतच ती दगावली. स्वाभाविकच सीताराम आणि त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, त्याच्या कुटुंबावर आलेल्या संकटांची ही   ओयम पोलिसांकडे गेलाच कसा, असे म्हणत त्याला पोलिसांचा खबरी ठरवून त्याची हत्या करण्यात आली. ओयमने पूवर्ती येथीलच मुलीशी प्रेमविवाह केला होता. ओयमचे घर तसे सुशिक्षित आणि घरची स्थिती बरीच. त्याचाही राग माडवी हिडमाला होता. कारण, शिक्षण घेणे, सरकारातील माणसांशी बोलणे म्हणजे गुन्हा हा भारतातील माओवादाचा पहिला धडा. त्याच कारणाने ओयम आणि त्याचे कुटूंब दंतेवाडा येथील वालनाडमध्ये स्थायिक झाले होते. परंतु, पत्नी गर्भवती असल्याने ती माहेरी आली होती आणि त्याचमुळे आयेमही पूवर्तीला होता. या दुर्दांत घटनेनंतर १३ ऑगस्टला   ओयमच्या पत्नीची तेरवी होती. त्यासाठी ओयमचा लहान भाऊ १६ वर्षीय स्वयंम शंकर पूवर्तीला शालेय गणवेषात आला होता. तो शालेय गणवेषात गावात दाखलच कसा झाला, या रागावरून हिडमाच्या चिथावणीवरून स्वयंमलाही दांड्यांनी मरेस्तोवर मारहाण करण्यात आली. पाचच दिवसाच्या अंतरात दोन्ही भावांची हत्या करून माओवाद्यांनी आपल्या भेसूर हास्य दर्शन घडवले आहे. खरे सांगायचे तर दुर्गम पुवर्तीमध्ये आरोग्य आणि पायाभूत सुविधा पोहोचवणे सोपे व्हावे तसेच या गाववरून माओवाद्यांचा प्रभाव कमी व्हावा, यासाठी तेथे सीआरपीएफच्या कोब्रा बाटलीयनचे कॅम्प उभारण्यात आले आहे. जिथे सेना तिथे भारतीय अस्मितेचा मान आणि भान देणारा राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकणारच. सेनेच्या वतीने काहीच दिवसांपूर्वी पुवर्तीमध्ये प्रथमच तिरंगा फडकावण्यात आला होता. जिथे तिरंगा तेथून दमांकर्यां ना पळ काढावा लागतो आणि लालसलाम निकामी होते. त्याचा राग म्हणच सीताराम आणि शंकर यांच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत. पुवर्तीपर्यन्त रस्ता बनवण्याचे कार्य सुरू आहे. या कार्याला रोखण्यासाठी पोलीस वाहनांना भुसुरुंग लावून उडवणे,  पोलिसांच्या हत्या करणे, मशीनरी नेस्तनाबूत करणे असे प्रकार तिथे सुरू असल्याचे प्रकर्षाने जाणवते. स्फोटात परखच्चे उडालेले वाहनांचे अवशेष या क्रूर कृत्यांची प्रचीती देणारे ठरते.


- *प्रवीण खापरे*

(शोधयात्रेतील सदस्य - दत्ता शिर्के, प्रवीण खापरे, अजिंक्य थेर, शुभम निकम, निखिल खाटबागे)

रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

अजी म्या देवाचा गणगोत पहिला...!

 रिक्षावाला खूप आपुलकीचा होता. त्याने सांगितले... काहीच वेळापूर्वी एक माणूस इथे आला होता. एकही कपडा अंगावर नसलेल्या या बाईला बघून, त्याने त्याचा घातलेला पॅन्ट काढला आणि या हिला स्वतः घालून दिला. स्वतःचा नवीन शर्ट काढला आणि तोही घालून दिला. स्वत: मात्र, तो चड्डीवरच आपल्या बाईकने निघून गेला. हे ऐकून अंग शहारले होते.

------
अजी म्या देवाचा गणगोत पहिला...!

अध्यात्मात चमत्काराला नव्हे तर साक्षात्काराला आणि त्याहून अधिक महत्व अनुभूतीला आहे, असे म्हणतात...

 याचा अर्थ, मी काही इथे धर्म-अध्यात्माचे विवेचन वगैरे करणार नाही. माझ्या मते मी सध्या तरी ब्रह्म-कर्माच्या प्रांतात आलेलो नाही आणि आलो असेलही तरी त्या संदर्भातला साक्षात्कार अद्याप झालेला नाही, अनुभूती आलेली नाही. तो आयामातला क्षण असतो, असेही म्हटले जाते.
‘अजी म्या देवाचा गणगोत पहिला...!’ हे जे मतीर्वन लिहिले आहे, त्याचा मथितार्थ म्हणजे मला झालेला भौतिक साक्षात्कार होय.
मी पत्रकारिता क्षेत्रात असल्याने स्वाभाविकच रात्रीचा किडा आहे. एका अर्थाने रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने, उशिराने घरी जाणे आलेच आणि त्यायोगे रात्री उशिरापर्यंत जागरणही...
बुधवार, १ नोव्हेंबर २०२३ला नेहमीप्रमाणे रात्री १२.३० वाजता मी ऑफिसबाहेर पडलो. सोबत माझे सहकर्मी पत्रकार सुनील चरपे होते. त्यांचे कृषी क्षेत्रातील ज्ञान, चिकित्सा आणि त्यांचे शोधन बघता, मी त्यांना प्रेमाने कृषीगुरुजी अशी हाक मारत असतो. दिवसभराच्या घडामोडींवर चर्चा करत बैद्यनाथ चौकातून ते आपल्या घराकडे वळले आणि मी सरळ आपल्या घराकडील मार्गाने लागलो. अशोक चौक पार करत असताना चौकाच्या मधोमध मला एक पुसटशी प्रतिमा जाणवली. ती प्रतिमा म्हणजे काही सावली, आत्मा किंवा भुताटकी वगैरे नव्हती. ती एक बाई होती. मला ती विवस्त्र जाणवली. परंतु, रात्री घराकडे जाण्याच्या धुंदीत त्याकडे फार असे लक्ष दिले नाही. आणि उत्तररात्री कशाला कुणाच्या भानगडीत पडायचे, ही एक भीतीही होतीच. मी आपला ग्रेट नाग रोडने पुढे निघालो.
अशोक चौक पार करताच, उजव्या हाताला नागोबाचे छोटेसे देऊळ आहे. दहा मिटर अंतरावर दुर्गेचे मंदिर आहे आणि मंदिरावर शिवशंकराचे मोठे चित्र आहे. डाव्या हाताला श्री गजानन महाराजांचे आणि दहा मिटर अंतरावर हनुमंताचे देऊळ आहे. नेहमीप्रमाणे या सर्व देवळातील देवतांना नमस्कार करत आणि नियमित मंत्रजाप करत पुढे निघालो. आणि मन अस्वस्थ झाले. क्षणार्धात विचारांचा हलकल्लोळ उठला आणि चिंतन सुरु झाले. स्वतःला मूर्ख, भित्रट, बोगस आदी सर्व विशेषणे देणे सुरु झाले. अर्धरात्री एक असहाय स्त्री विवस्त्र दिसली असताना, मी त्याकडे कानाडोळा करून, भीती बाळगून पुढे निघालो. त्यावर देवांना नमस्कारही करतो आहे आणि मंत्रजाप करून, मी काय साध्य करतो आहे, असा प्रश्न मला त्यावेळी पडला. शेवटी नमस्कार केलेला हनुमंत आत्ताच अवतरेल आणि सनकन माझ्या थोबाडीत मारेल, असे मला त्यावेळी वाटून गेले. मला मी मनुष्य असल्याची लाज वाटायला लागली आणि मी करत असलेल्या माणुसकीच्या गोष्टी फालतू वाटायला लागल्या.
उत्तररात्र असल्याने आणि हिवाळ्याचेच दिवस असल्याने गारठा जास्त जाणवत होता. मला आठवले आज मी गडबडीत स्वेटर घातली नव्हती. ती माझ्या पिशवीत होती. मी तडक रेशीमबाग चौकातून गाडी वळवली आणि अशोक चौकातील नागोबाच्या देवळाजवळ असलेल्या सिग्नलजवळ उभी केली. विवस्त्र अवस्थेतील ती बाई त्याच जागी उभी होती. मी स्वेटर काढली आणि तिच्या दिशेने चालायला लागलो. तेवढ्यात मागून आवाज आला, दादा टेन्शन नको, आम्ही पण तुमच्या सोबत आहोत. जणू, घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे... असा तो धिर होता. विशेष म्हणजे त्या अर्धरात्री जो आवाज आला तो एका तरुण मुलीचा होता. एक मुलगा आणि त्याच्या मागे दोन मुली, त्या विवस्त्र बाईसाठी काही कपडे घेऊन आले होते.
नंतर मी फक्त बघ्याच्या भूमिकेत होतो. त्या तिघांनी तिला टी-शर्ट घालून दिली. जवळच एक ई-रिक्षावाला होता आणि रात्री समारंभात जेवणाची कामे आटोपून आलेल्या काही ताई-बाई-अक्का होत्या. त्यांनीही आपल्याकडील शाल आणि एक चादर तिच्यावर ओढली.
रिक्षावाला खूप आपुलकीचा होता. त्याने सांगितले... काहीच वेळापूर्वी एक माणूस इथे आला होता. एकही कपडा अंगावर नसलेल्या या बाईला बघून, त्याने त्याचा घातलेला पॅन्ट काढला आणि या हिला स्वतः घालून दिला. स्वतःचा नवीन शर्ट काढला आणि तोही घालून दिला. स्वत: मात्र, तो चड्डीवरच आपल्या बाईकने निघून गेला. हे ऐकून अंग शहारले होते.
त्यानंतर तिला मदत करण्यासाठी बरेच जन पुढे आले. अखेर मीच विचारले, तुझे घर कुठे, तू कोण... तेव्हा तिने तिचे नाव मंगला परसराम चौधरी असे सांगितले. हसनबाग परिसरातील सहकारनगरमध्ये प्लॉट नंबर ३२ असा पत्ता तिने सांगितला. मी सोडून देतो म्हटल्यावर सुरुवातीला आलेले तीघे सांची, साक्षी आणि विनीत यांनी मला तुम्ही एकटे जाऊ नका, आम्ही सोबत येतो म्हणाले. तिचे घर शोधले. परंतु, ते काही सापडले नाही. ती वेडसर होती, हे तेव्हापर्यंत कळून चुकले होते. वाटेत तिने मला तिच्याजवळचे सारेच पैसे देऊ केले. मी हसलो आणि तुलाच मी देतो, असे म्हटले तर ती गप्प झाली. तिच्याशी केलेल्या संभाषणातून तिरळे कुणबी, काळे देव, नवरा, केस दान केले अशा गोष्टी कळल्या. अखेरचा पर्याय म्हणून तिला नंदनवन पोलीस ठाण्यात रात्री १.३० वाजता पोहोचवले आणि पोलिसांच्या सांगण्यानुसार आम्ही घराकडे परतलो.   
तर, अशा तऱ्हेने मला देवाचा गणगोत सापडला. मदत सगळ्यांनाच करायची असते. परंतु, नको त्या भानगडींमुळे कुणी सरसावत नाहीत. एकाने पुढाकार घेतला की सगळ्यांची पाऊले पटापटा येतात. म्हणाल तर तुम्ही केलेल्या चांगल्या कार्याला देवच पाठींबा देतो. माणसात देव असतो ना किंवा माणसात देव शोधावा म्हणतात ना... मग या घटनेत ‘अजी म्या देवाचा गणगोत पहिला...’ असे म्हटले तर काय गैर आहे.

वंदे मातरम

प्रवीण खापरे
..........

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

Geeta or Sanvidhan

 *गीता या संविधान?* 

 हा प्रश्नच मुळी किती मूर्खपणाचा वाटतो आणि हा प्रश्न उपस्थित करणारे किती बालबुद्धीचे व उत्तर देणारे बुद्धीजीवी कसे आपमतलबी आहेत, हे सिध्द होते. 

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विचारांवर आधारित सहा-सात वर्षापूर्वी मी लिहिलेल्या  ‘वि...’ या नाटकात भारतीय संविधानावर एक वाक्य आहे. ‘देशाला चालविणारे सकारात्मक विधान म्हणजे संविधान. म्हणून, संविधान हे माझ्यासाठीच नव्हे तर समस्त राष्ट्राभक्तांसाठी राष्ट्रग्रंथ आहे.’   

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान देशापुढे ठेवले तेव्हा संविधानावर अनेक स्तरावरून नकार म्हणा वा विरोध केला होता, असे तत्कालीन अनेक लेखांवरून, तत्कालीन नोंदींवरून स्पष्ट होते. मात्र, सावरकरांनी याच संविधानाला डोक्यावर घेतले होते आणि संविधानाची स्तुती करणारा पहिला लेख त्यांनी प्रसिध्द केल्याचे सांगितले जाते. त्याच लेखात त्यांनी संविधानाला राष्ट्राग्रंथ म्हणून गौरवले होते. नांदेडचे सावरकर विचारांचे विश्लेषक डॉ. पुरुषोत्तम मोरे यांच्या एका व्याख्यानात मी हे ऐकले होते. 

*आता, गीता (श्रीमदभगवतगीता) की संविधान? या प्रश्नावर येऊ...* 

मी दोन्ही अद्याप वाचलेले नाही. केवळ त्यांचे सारांश तेवढे वाचले आहेत. त्यामुळे, या दोन्ही महान ग्रंथांवर बोलण्याचा मी अधिकारी तर नक्कीच नाही. सध्या दोन्ही ग्रंथ टप्प्या टप्प्यात वाचण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि ते समजून घेत आहे. मात्र, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश, जीवन दर्शन म्हणून मानवी जीवनासाठी किती महत्वाचा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ज्यांना गीता समजून घ्यायचीच नसेल, त्यांना सांगून अर्थही नाही. याच गीतेमध्ये राष्ट्राला अनन्य साधारण महत्व दिले गेले आहे. एका अर्थाने, मनुष्य ज्या भूमीमध्ये जन्मतो तिला ‘जननी जन्मभूमी’ अर्थात माता म्हटले आहे. अर्थात देशाशिवाय अन्य कोणतेही नाते, अन्य कोणतेही कर्तव्य मोठे नाही. एवढेच नव्हे तर सर्वच पुराण, निषद-उपनिषदांमध्येही जन्मभूमीला सर्वोच्च स्थान दिले आहे. 

अनेक तज्ज्ञ विश्लेषकांच्या तोंडून श्रीमदभगवतगीता सार ऐकण्याचे, लिखाणांतून वाचण्याचे भाग्य लाभले, त्यात श्रीमदभगवतगीता ही अखिल मानवतेसाठी जीवन जगण्याचे सर्वोच्च ग्रंथ असल्याचेच स्पष्ट होते. एका अर्थाने गीता ही मनुष्य प्राण्याला कर्तव्योन्मुख करणारे महान ग्रंथ आहे. आणि संविधान हे देशाला चालविणारे राष्ट्रग्रंथ आहे. मग, तुम्ही प्रथम कोणते ग्रंथ मानता? गीता की संविधान? हा प्रश्न उपस्थित करणे संयुक्तिक ठरते का?

एक हिंदू म्हणून, माझ्यासाठी श्रीमदभगवतगीता सर्वोच्च आहे आणि श्रीमदभगवतगीतेच्या उपदेशानुसार जन्मभूमीविषयीची कर्तव्य भावना सर्वप्रथम ठरते. विविध मतांचा आदर करत आधुनिक भारत हा संविधानानुसार चालतो आहे. आणि संविधान निर्माते हे काही परके नाहीत. ते भारतीयच आहेत. मग, श्रीमदभगवतगीतेच्या उपदेशानुसारच देशाला अनुकूल असे संविधान न मानण्याचे कोणतेही कारण कोण्याही हिंदुच्या मनात नक्कीच नाही. उलट देशात संविधानाचा सर्वाधिक सन्मान हिंदुंव्यतिरिक्त कोणी करत असेल, अशी शंकाच वाटते! कारण, जेव्हा स्वार्थ पुढे येतो तेव्हा काहींना संविधान आठवतो आणि हेच संविधान जेव्हा काहींच्या स्वार्थावर बोट ठेवते, तेव्हा त्याला अन्याय संबोधले जाते.

शेवटी.... “देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो” हे सावरकरांचे वाक्य “गीता की संविधान’ प्रश्नाला समर्पक असे उत्तर ठरते. कारण जो श्रीमदभगवतगीतेला सर्वोच्च मानतो, त्याच्यासाठी संविधान कुठेच कमी नाही... संविधान श्रेष्ठच ठरते. 


प्रवीण खापरे,

पत्रकार व नाट्यलेखक, दिग्दर्शक

७५०७७७५८९७

सोमवार, २ जानेवारी, २०२३

ज्ञान-विज्ञान-अनुसंधान


ज्ञान
-विज्ञान-अनुसंधान


ज्ञान-विज्ञान अदम्य साहस तथा विश्वास से जुडा अनुसंधान है, 
वहाँ अंधविश्वास काे कोई स्थान नहीं,
विश्वास के साथ संदेह, अपार संभावनाओं को जन्म देता है,
अविश्वास के साथ नकार, अनुसंधान के राह में रोडे है...

- बाळराजे

  

बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

time travel सहजच नाटकाविषयी

time travel  सहजच नाटकाविषयी


समजा आपण आपले आयुष्य १०० वर्ष गृहीत धरले आणि ही १०० वर्षे नाटकात मांडायचे ठरवले तर त्याला काय म्हणावे? माझ्या मते यालाच ‘टाईम ट्रॅव्हल’ म्हणावे लागेल. हा १०० वर्षाचा भागच नव्हे तर आपण सादर करणारे प्रत्येक नाटक ‘टाईम ट्रॅव्हल’च्या संकल्पनेत येते. १०० वर्षाचं उदाहरण देऊन आपण ते स्पष्ट करू शकतो. 

एकांक वगळता दिर्घांक, दोन-तीन-चार अंकी नाटक, महानाटक ही सगळी ‘टाईम ट्रॅव्हल’चाच भाग आहेत. दिवसाचे २४ तास, वर्षाचे ३६४.२५ दिवस आणि १०० वर्षे, आपण दीड ते दोन-अडीच तासात सादर करतो. म्हणजे नेमकं काय करतो? हा प्रश्न पडला तर ‘टाईम ट्रॅव्हल’चे गणित समजून येईल. ३६४.२५ गुणिले १०० म्हणजे ३६ हजार ४२५ दिवस. आता दिवसाच्या २४ तासाला ३६,४२५ दिवसाला गुणले तर ते तास भरतात ८ लाख ७४ हजार २०० तास. आता एका तासाला ६० मिनिटे म्हणजे ८,७४,२०० गुणिले ६० म्हणजे ५ कोटी २४ लाख ५२ हजार मिनिटे. आता एक मिनिटात ६० सेकंद म्हणजे ५,२४,५२,००० गुणिले ६० केले तर कॅलकुलेटर साथ देणे सोडते. हे सेकंद भरतात हजार खरबच्या वर. पुन्हा मायक्रोसेकंद आहेच आणि त्याचेही लक्तरे काढली तर महाशंख ही सर्वोच्च संख्याही तोकडी पडावी. असे हे ‘टाईम ट्रॅव्हल’चे गणित आहे. मग, एखादे बायोपिक, चरित्रपट आणि चरित्रातील एखादी घटना किंवा काल्पनिक पट, वैचारिक पट हे सगळे नाटक, सिनेमात रंगवताना ‘टाईम ट्रॅव्हल’च्या गणितातूनच शक्य होतात. फक्त आपण त्याकडे ‘टाईम ट्रॅव्हल’ म्हणून बघत नाही, एवढेच. हे गणित आणखी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी बायोपिकचे उदाहरण उत्तम ठरेल. आयुष्याच्या शंभर वर्षाचा काळ बायोपिकमध्ये गृहित धरला आणि ही बायोपिक दोन तासात मांडायचे आहे. शंभर वर्षे म्हणजे शंख-महाशंख मायक्रोसेंकद आणि दोन तास म्हणजे ४ लाख ३२ हजार मायक्रोसेकंद. म्हणजे आयुष्य जर २४ तासाचेच गृहित धरले तर हे नाटक एक मायक्रोसेकंदच्याही निम्याच्या निम्म्याच्या निम्मे होईल. म्हणजे नाटक किंवा सिनेमा ‘टाईम ट्रॅव्हल’च्या माध्यमातूनच प्रेक्षकांपुढे सादर करित असतो, याची जाणिव रंगकर्मींना होईल. हेच ‘टाईम ट्रॅव्हल’ आपणाला सती, त्रेता, द्वापार युगासोबतच अर्वाचिन कलियुगातूनही घेऊन जाते ते तत्कालिन साहित्याच्या आधारे.

ही थिअरी मीच मांडली आहे, असा दावा मी करत नाही...

- बाळराजे

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

जंगल है आधी रात है...

 जंगल है आधी रात है...


घने जंगल में, आदिमो की बस्ती में,
था एक छोटा सा घर मेरा...
घर में था अकेला, बच्चों को पढाने वाला,
जैसे एक अध्यापक...
आधी अंधियारी रात में, थंड से सिकुडन भरती हवाओ में,
दर पर सुनी ठक ठक सी आवाज...
खडी थी एक अबला, थंड से कपकपाती,
अकेले भयभीत...
स्वागत किया उसका, मानो वह लक्ष्मी-सरस्वती हो,
गर्म चाय दी और दिये ओढने को कुछ कपडे...
फिर मैं निकला चौखट के बाहर, शॉल ओढे, 
वो बोली... ठंड है, जंगली जानवर है,
तुम कैसे सहोगे...
मैं हंस कर बोला...
सह लुंगा ठंड, कर लुंगा जानवरों से संघर्ष,
जान पर आयी तो योद्धा बन जिवित रहुंगा,
चौखट के भितर रहुँ तो,
किस किस को जवाब दूंगा?

बाळराजे
..............