मंगळवार, ५ एप्रिल, २०१६

'गुढी' उभारू 'व्यसनमुक्त' भारताची


'गुढी' उभारू 'व्यसनमुक्त' भारताची




वैश्‍विक विकासाच्या उपक्रमांत आघाडी मिळविण्याची किमया भारतीय तरुणाई साधत असताना, त्याच तरुणाईला एका भयंकर समस्येन्ंो विळखा घातला आहे. तो विळखा व्यसनाधीनतेचा होय! वर्तमानात व्यसनाची परिभाषा नेमकी कशी करायची? असा जर प्रश्न पडत असेल, तर 'अति तिथे माती' हे तीन शब्द पुरेसे ठरावे. प्रारंभी 'जस्ट चिल' म्हणून स्पर्श करावा आणि नंतर 'मस्ट फिल' अशी स्थिती होऊन जावी, त्यालाच 'व्यसन' असे म्हणावे. 'शक्तिवर्धक' तारुण्याला 'भस्मसात' करण्याची अनैतिक व्यूहरचना म्हणजेच 'व्यसन' असे म्हटल्यास वावगे ठरू नये! हाच चक्रव्यूह भेदण्याचा संकल्प या वर्षप्रतिपदेला गुढी उभारून घेऊया...
लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो आणि त्याच लोकसंख्येतील ४0 टक्के जनता ही ३५ वय वर्षांपेक्षा कमी आहे. याचा अर्थ देशातील साधारणत: ६0 कोटी लोकसंख्या ३५ वर्षांहून कमी वयाची आहे. त्यामुळे, जगात भारत हा सर्वाधिक तरुण देश म्हणून ओळखला जातो. आणि म्हणूनच जगाचे नेतृत्त्व करणार्‍या राष्ट्रांचे लक्ष भारताकडे लागले आहे. किंबहूना, भविष्याचा नेतृत्त्वकर्ता राष्ट्र म्हणूनही भारताकडे बघितले जाऊ लागले आहे. हजारो वष्रे जुनी संस्कृती असलेल्या भारताचा पाया येथील नितिमत्ता आणि संस्कारांनी अधिक सशक्त आणि प्रगल्भ झाला असताना, एका वेगळय़ाच 'व्हायरस'ने त्याला ग्रासण्यास सुरुवात केली आहे. हा 'व्हायरस' व्यसनाचा होय!
या 'व्हायरस'ला प्रतिबंध घालण्यासाठी एका 'अँण्टीव्हायरस'ची गरज आहे आणि तो 'अँण्टीव्हायरस' म्हणून संयमाचा संकल्प होय. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या आधारावर आज देशातील ५0 टक्के महाविद्यालयीन तरुणाई जी पूर्णपणे आपल्या पालकांवर निर्भर असते, ती विविध व्यसनांच्या आहारी गेली आहे. तर, त्याहून अधिक टक्का 'सेल्फ डिपेंडंट' अर्थात नोकरी किंवा धंदेवाईक तरुणाईचा लागतो, हे विशेष! या व्यसनात सिगारेट, दारू, गुटखा, तंबाखू, खर्रा, व्हाईटनर अशा कित्येक गोष्टींचा समावेश होतो. विशेष म्हणजे, या गोष्टींमध्ये ही तरुणाई त्यांच्या स्व:खर्चाचा किंवा उत्पन्नाचा बराच मोठा भाग खर्ची घालतात, जो निकामी किंवा निर्थक असाच म्हणावा लागेल.
स्पर्धेच्या या काळात वाढत्या खर्चाचा ताळमेळ साधताना कमाईची नवीनवी संसाधने शोधली जात असताना, असला निर्थक खर्च कोणत्या कामाचा? असा प्रश्न न पडणे, हे आपल्या तरुणाईचे दुर्दैवच म्हणावे लागेल. अशा डळमळत्या पायावर भविष्यातील जगाचे नेतृत्त्व कसे काय सोपविले जाऊ शकते? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. एकीकडे आपण विश्‍वगुरू पदाला पोहोचणार्‍या राष्ट्राचे प्रतिनिधी म्हणवितो आणि दुसरीकडे डळमळत्या पायावर नेतृत्त्व करण्याचे स्वप्न बघतो. ही परस्पर विरोधी विदारक वास्तविकता मान्य करून, डळमळायला लागलेल्या तरुणाईचे पाय स्वत: तरुणाईने आत्ताच सांभाळणे गरजेचे आहे. अन्यथा, बधिर मनोवृत्तीवर कुणीही सहजरित्या ताबा मिळवू शकतो आणि पुन्हा आपल्यावर वर्चस्व गाजवित आपल्याला 'गुलाम' बनवू शकतो, याचा विचार होणे गरजेचे आहे. याला आपला इतिहास साक्षीदार आहे, त्यामुळे वेगळे सांगणे नको..

रविवार, २० मार्च, २०१६

नाठाळांची उपरेगीरी़़़

नाठाळांची उपरेगीरी़़़

देशद्रोही उणे सव्वाशे कोटी!

देशद्रोही उणे सव्वाशे कोटी!


हा देश भांड लोकांचा आहे की काय? असा प्रश्न पडायला लागतो कधी कधी! इतिहासाचा मागोवा घेतला की वर्तमानातील घडामोडींशी ‘कुधर्म्य’ साधलाच जातो़़ ज्या देशाचा इतिहास अत्यंत ज्वलंत आहे असे म्हटले जाते किंवा आपण ते आपल्यापुढे आलेल्या कागदी पुराव्यावरून जाणतोच़ त्याच इतहासातल्या विश्वबंधुत्त्व, मानवता, देश, धर्म आणि समाजासाठी लढणाºया महापुरुषांच्या कार्यकर्तृत्त्वाशी आणि विचारांशी साधर्म्य साधला गेला असता तऱ़ देशभक्तांची तर सोडाच, किमान भारतीयांची छातीही गर्वाने फुलून गेली असती़ परंतु, नेमके त्या ऊलट स्थितीशी वर्तमानकालिन पिढीच्या मनोवृत्तीला सामना करावा लागत आहे़ त्यामुळे, जगात टक्केवारीने मोठ्या संख्येने असलेल्या तरुण भारतीयांची दिशा कोणत्या मार्गाने जाणार? असा विदारक प्रश्न उपस्थित होतो़ विदारक, याचसाठी की कित्येक आक्रमणांनी जरजर झाला असतानाही आजतागायत तग धरून असलेला जगाच्या पातळीवर भारत, केवळ एकमेव देश आहे आणि तो ‘भारत’ या विचारांमुळेच़ परंतु, वर्तमानकालिन घडामोडींचा केवळ हलकासाही वेध घेतला तरी त्यामागचे जड कारस्थान किती भविष्यघातकी ठरणार आहे, याची जाणिव व्हायला लागते़ एकप्रकारे, कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या वाममार्गिंच्या कुटील कारस्थानाकडे दुर्लक्ष करण्याचे भोग भोगण्याची वेळ आयतीच चालून आली आहे, असे म्हणण्यास वावगे ठरू नये़ 

इस्लामी दहशतवादाशी इस्लामी अनुयायांचाच संबंध असणार आहे़ परंतु, त्यामुळे, संपूर्णच्या संपूर्ण इस्लाम दहशतवादी होत नाही, असे आपणच मोठमोठ्याने म्हणतो आणि ते खरेही आहे़ परंतु, दहशतवादी कारवायांमध्ये मुस्लिमच सापडत असताना, दुसºयांना दहशतवादी कसे ठरवायचे़़ असा प्रश्न आपुसकच विचारला जातो़ त्याच ऊलट, त्याच इस्लामी दहशतवाद्यांच्या कारवायात मृत पावलेल्यांची संख्या इस्लामी अनुयायांचीच अधिक आहे आणि त्या दहशतवादी कारवायांविरोधात लढा उभारणाºयांमध्ये इस्लामी अनुयायी मोठ्या संख्येने दिसून येतात़ मग, हिंदू बहुसंख्येने असलेल्या भारताला या इस्लामी दहशतवादापासून संकट आहे़़ असे म्हणने योग्य ठरेल की अन्य कोणते संकट भारतापुढे उभे आहे?
 ‘संकट कोणते’ हा प्रश्न उभा राहण्यामागे, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठा(जेएनयू)मध्ये जे ‘आजादी’चे चोचले सुरू आहेत आणि त्यामधून ‘भारत के तुकडे तुकडे’ करण्याचा जो घाट घातला जात आहे, ते कारणीभूत आहे़ विशेष म्हणजे, या प्रकरणात कोणी एक मुस्लिमच नव्हता़ तसा असता तर त्याला एक तर काश्मिरी फुटीरवादी किंवा पाकिस्तानधार्जिना म्हणून त्याच्यावर तोंडसुख ओढले गेले असते, हे नव्याने सांगायला नको़ तर, त्या प्रकरणात हिंदू नामावलींचा भरणा मोठ्या संख्येने दिसून येत होता़ (ते स्वत:ला हिंदू समजतात की अन्य कोणते मतावलंबी, हे त्यांनाच ठाऊक) देशाचे कंबरडे मोडण्यासाठी जसे इस्लामी दहशतवादी बाहेरून ताणून बसले आहेत़ तसेच, देशाला आतून पोखरण्यासाठी अंतर्गत समाजही सज्ज आहे, हे याच ‘जेएनयू’ प्रकरणावरून दिसून येत आहे़ आणि त्याच प्रकरणाचे समर्थन करण्यासाठी काल-परवाच बंगालमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चामध्येही ‘आजादी’चे चोचले थेट दिसून आले़ विशेष म्हणजे, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया पक्षालाही या ‘आजादी’चा मोठाच पुळका येत असल्याचे दिसून येत आहे़ या पक्षकर्मींना हे का समजू नये़़ की स्वातंत्र्यलढा हा देशभक्तांनी उभारला आणि त्या देशभक्तांनीच विविध संघटना किंवा पक्षांची स्थापना केली़ जे या पक्ष किंवा संघटनांमध्ये नव्हते, त्यांचेही बलिदान तेवढेच मोठे ठरते़ त्यामुळे, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे श्रेय घेण्याचे कारस्थान करून, इतर देशभक्तांचा अपमान करण्याइतपत मजल जाणाºयांकडून देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची अपेक्षा कशी करता येईल? 
कोणावर अन्याय झाला किंवा  नाही, हे न्यायव्यवस्थाच ठरवेल़ परंतु, अन्याय झाला म्हणून त्याने संबंध देशाला वेठीस धरावे आणि देशद्रोही कारवाया कराव्या, हे कितपत योग्य ठरावे आणि त्याचे समर्थनही करणे हे कितपत न्यायसंगत ठरेल़ विशेष म्हणजे, देशद्रोही कारवाया करणाºयांची तुलना थेट देशभक्तांशी करावी म्हणजे देशात अराजकता माजवण्याचाच हा प्रयत्न नव्हे काय? सत्तेविरूद्ध वागणे आणि देशाविरोधात वागणे, यात तात्त्विकदृष्ट्या जमीन आसमानचाच फरक आहे़ परंतु, सत्तेविरोधात वागणाºयांना देशद्रोही ठरवावे आणि देशद्रोही कारवायांना चालना देणाºयांना ‘हिरो’ ठरवावे, याला इतिहासात देशावरील संकटाला आमंत्रण देणाºया ‘जयचंदा’च्या भरतीची प्रक्रीयाच म्हणता येईल़ देशद्रोह म्हणजे देशद्रोहच असतो़ ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाºयाला देशभक्त कसे म्हणता येईल़ आणि हे थेट होत असतानाही, त्याच्यावरील देशद्रोहाचे पुरावे शोधण्याची मागणी करणे म्हणजे न्यायव्यवस्थेचे वाभाडे काढण्यासारखेच होईल़ गेल्या वर्षभरात संबंध भारताने वाममार्गियांनी याकुब, अफज़लसारख्या ‘जयचंदां’चे समर्थन करताना पाहिले आहे़ त्यामुळे, त्यांना भारतीय म्हणने लाजीरवाणेच ठरावे़ याच नमकहरामांसाठी का देशाच्या सीमेवर प्रहरी बाह््यशत्रूंशी डोळ्यात तेल ओतून, उणे अंशाच्या खाली गेलेल्या तापमानात लढा देत असतात़ विशेष म्हणजे, हे सगळे प्रकरण होत असताना आपला प्रहरी त्याच समर्थकांच्या ‘हिरों’शी लढताना शहिद होत आहेत़ तेव्हा, अशा समर्थक नमकहरामांना सव्वाशे कोटीच्या लोकसंख्येतून उणे करणे, हेच सुखरूप भविष्याचा वेध ठरणार आहे़ देशाला संकटात ओढवून घेण्यापेक्षा आणि देशाचे पुन्हा तुकडे होऊ देण्यापेक्षा, त्यांची ‘उणेवारी’ होणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल़ सध्या मात्र सव्वाशे कोटी लोकसंख्येत भारतीयच आहेत का? असा गहन प्रश्न अंत:र्मनातून निर्माण होतो आहे़

प्रवीण खापरे
(७५०७७७५८९७)