नाठाळांची उपरेगीरी़़़
‘मानेवर सुरा जरी ठेवला तरी भारत माता की जय म्हणणार नाही’ अशी दर्पोक्ती ठोकणाºया असउद्दीन ओवैसीला त्याच्याच धर्मबांधवानी जोरदार चपराक लावली आहे़ सर्वस्तरातून त्याच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध केला जात आहे़ विशेष म्हणजे अवघ्या चित्रपटसृष्टीला आपल्या काव्य आणि लेखणीने भारून टाकणाºया जावेद अख्तर यांनी तर त्याच्या दाढी, टोपी आणि शेरवानीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याच्यासमोर संविधानाचा आरसाच उभा केला आहे़ जावेद अख्तर यांची पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमी यांनी तर ‘माता’ ऐवजी ‘अम्मी’ म्हणायचं आहे का? असाच प्रश्न त्याला विचारून त्याची खिल्लीच उडवून टाकली़
एकीकडे मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा आरोप हिंदुत्त्ववादी संघटनांवर लावला जात असताना दुसरीकडे, आपण या देशाचे पुत्र नसल्याचेच उघड स्पष्टीकरण देऊन खुद्द मुस्लिमांना मुख्य प्रवाहापासून तोडण्याचे कटकारस्थान असउद्दीन आवैसी या मतलबी राजकारण्याने केले आहे़ धर्मावर आधारित असलेला पक्ष आणि केवळ आपधर्मीयांच्या हक्कासाठी लढण्याचे बिरूद स्वत:लाच चिकटलवलेला हा आवैसी, खुल्या व्यासपीठांवरून स्वत:च्या देशभक्तीवर कुणालाही प्रश्न उपस्थित करू देत नाही़ परंतु, त्याने हे वक्तव्य करून स्वत:च्याच देशभक्तीवर स्वत:च प्रश्न निर्माण केला आहे़ त्याला मानणाºयांवरही हा प्रश्न आपसुकच उपस्थित होतो़ मग तो कोणत्याही धर्माचा का असेना़़व्यवसायाने स्वत: वकील असलेला हा ओवैसी कोणत्याही आरोपाला परवून लावण्यासाठी प्रत्येक वेळेला संविधानाचा दाखला देत फिरत असतो़ परंतु, संविधान म्हणजे तरी काय? याचा उलगडा खरेच का त्याला झाला आहे़़़ असा संशय त्याच्या वागण्यावरून येतो़ देशात काही लोक उठसुठ संविधानाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गैरवापर करताना दिसतात़ मग, तो रोहित वेमुला असो, कन्हैया कुमार व उमर खालिद किंवा अनिर्बाऩ़ सगळ्यांनीच संविधानाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य तत्त्वाचा अपमान केल्याने निदर्शनास येते़ संविधान म्हणजे एक राष्ट्रग्रंथ, एक संस्कृतीरक्षणाचा दुवा, एक समानतेचा मजबूत धागा, विकासाचे द्योतक आणि मर्यादा जपण्याची कठोर सुचना देणारा ग्रंथ, असायला हवा आणि कदाचित भारतीय संविधानात हेच सांगितले आहे़ परंतु, ते सगळे तत्त्व पायदळी तुडवण्यात धन्यता माणणारे हे धुरिण फुटीरतावादी तत्त्वाला चालणाच देत नाहीत का?
जीच्या पोटी जन्म झाला तीला माता म्हणायचे, हे तत्त्व साºयाच धर्मात एकसारखेच आहे आणि तीचा जयजयकार करण्यावर कोणतेही निर्बंधही नसावेत़ त्यासाठी कुणा धर्मग्रंथाचा दाखला देणे, हे संबंधिताच्या बुद्धीमत्तेवर धूळ चढल्यासारखेच म्हणावे लागेल़ भारत या भूमीत आपला जन्म झाला आणि तिथेच वाढलो म्हणून तीला मातृभूमी असे म्हणतो़़ हे तत्त्व आपल्या वेद-पुराण आणि संविधानातही सांगितले आहे़ आता त्या मातृभूमीचे आभार मानण्यासाठीच्या तºहा प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात़ परंतु, त्या मातेला माता न मानता केवळ एक जमीनीचा तुकडा असलेला देश मानणाºयाच्या मातृनिष्ठा/राष्ट्रनिष्ठेवर प्रश्न का उपस्थित होऊ नये? आणि असा प्रश्न उपस्थित करणाºयावर धर्मांधतेचा आरोप लावणे, हेही चुकीचेच ठरावे़
धर्म आणि राष्ट्र, अशा दोन निष्ठा ज्यांच्यात असतात़ त्यांच्याच मनात आधि प्राधान्य कोणत्या निष्ठेला द्यावे, असे पुळचट विचार येणे स्वाभाविक आहे़ परंतु, भारतीयांचा धर्म आणि राष्ट्र एकच असल्यामुळे, त्यांच्या निष्ठा वेगवेगळ्या असू शकत नाही़ ज्यांच्या निष्ठा वेगवेगळ्या असतील, तो या भारत मातेचा सुपुत्र होण्याच्या लायकीचा नाही, हे नमूद करणे गरजेचे ठरते़ मग, असउद्दीन आवैसीबाबत वेगळे काय सांगायचे? स्वत:ला मी उपरा असे सांगण्यात धन्यता वाटणाºया या नाठाळ ओवैसीच्या उपरेगीवर आता काय बोलावे़़
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा