*सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती (बस्तर) मधील घेतलेला दुर्दांत घटनेचा वास्तववादी शोधदुर्दांत घटनेचा वास्तववादी शोध*
जनसंघर्ष समिती, नागपूर
छत्तीसगढ तसे मध्यभारतातील निसर्गसंपन्न राज्य. त्यातीलच बस्तर हे बहुसुंदर क्षेत्र. परंतु, लागलेली किड म्हणूयात की श्राप..! माओवाद्यांच्या क्रूर कृत्याने बस्तर डागाळलं आहे. माओवाद्यांच्या देशविरोधी कृत्यांमुळे इथला आदिवासी समाज आजही विकासापासून कोसोदूर आहे. या दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय यंत्रणा अतोनात प्रयत्न करत आहेत, रस्ते तयार करत आहेत. मात्र, माओवादी त्या सगळ्या प्रयत्नांना भूसुरूंग लावून उध्वस्त करत आहेत. त्यामुळं, पायाभूत विकासासोबत आरोग्य व्यवस्था आदिवासींपर्यंत पोहोचू शकत नसल्याचं चित्र आहे. सर्वात दु:खद गोष्ट म्हणजे, आजही बस्तरमधील अनेक दुर्गम गावांमध्ये आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे माओवाद्यांचा देशविरोधी चेहरा आहे. माओवाद्यांच्या सशस्त्र लाल क्रांतिच्या क्रुरतेपासून सर्वसामान्य आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी छत्तीसगढ पोलिस दल, सीआरपीएफ, बीएसएफच्या तुकड्याही इथे तैनात आहेत. त्यातूनच माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये क्रॉसफायरिंगच्या घटना इथं फारच सामान्य बाब आहे. गेल्या काही काळापासून माओवाद्यांना सुरक्षा दलाच्या मुस्तेदीमुळे बरच नुकसान सहन करावं लागण्यानं त्यांची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे. त्याचा वचपा ते सर्वसामान्यांचं जीव घेऊन काढत आहेत. त्यांच्या या कृत्यातून त्यांचे आक्रस्ताळे रूप प्रदर्शित होत असून, त्यांच्या विकृतीचे दर्शन घडत आहे. अशाच एका घटनेचा शोध घेण्यासाठी आम्ही जनसंघर्ष समिती, नागपूर आणि हेमेंदू रंगभूमी, नागपूरचे सदस्य बस्तरमधील सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती या गावात २९ ऑगस्ट २०२४ रोजी गेलो होतो. नागपूरपासून ५५०-६०० किमी अंतरावर असलेल्या पूवर्तीमध्ये जाणे किती अवघड आहे, याची जाणिव इथे आल्यावरच झाली. पूवर्ती हे गाव सुकमा जिल्ह्यातील अगदी टोकावरचे गाव. त्यामुळे, आम्ही तेथे आधी बिजापूर शहरात पोहोचलो. बीजापूर शहरापासून पूवर्ती हे अंतर ६५-७० किमी इतके आहे. भैरमगढ, उसुर, तर्हेम, दोरनापाल, जागरगोंडा अशा गावांतून जाताना पूवर्ती येथे पोहोचावं लागतं. तऱ्हेम, सिल्गेर, तिम्मापुरमपर्यंत डांबरी रस्ता असल्याने तीथपर्यंत वाहनास कसलीही अडचण आली नाही. मात्र, सुरक्षा दलाचे जागोजागी असलेले कॅम्प आणि जसजसे सिल्गेर, तिम्मापुरमपर्यन्त पोहोचावे, तसतसे त्यांचा वाढता राबता एकीकडे सुरक्षेची हमी देणारे तर दुसरीकडे माओवाद्यांच्या वास्तव्याचे भान देणारे होते. एक गोष्ट इथे अधोरेखित करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे, आम्ही ज्यांना-ज्यांना पूवर्ती गावाचा रस्ता विचारत होतो, त्यांचे चेहरे अचानक चमकून उठत होते. एक प्रकारची धास्तीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. ज्या घटनेचा शोध घेण्यासाठी आम्ही तिथवर पोहोचलो होतो, त्याबाबतही ते टाळल्यागत व्यक्त होत होते. सिल्गेर-तिम्मापुरम येथील सुरक्षा दलाच्या कॅम्पमध्ये विचारणा केल्यावर पुढचा सगळा अंदाज येऊन चुकला होता. तिथूनच उजवीकडे पूवर्ती गावाचे अंतर साधारणत: ११-१२ किमी इतके आहे. म्हणायला हे अंतर फार नाही. मात्र, इथेच पक्का रस्ता संपतो आणि सुरू होतो भयाण जंगलातला प्रवास. कच्चा रस्ता असल्याने आणि ठिकठिकाणी नदी-नाले वाहत असल्याने वाहन या मार्गाने जाऊच शकत नाही, अशी अवघड स्थिती आहे. त्यामुळे, आम्ही या मार्गाने पायीच जाण्याचा निर्णय घेतला. साधारणत: दिड किमी अंतर पायी चालल्यावर आम्हाला एक गाव सापडले. तेथे गावकऱ्यांशी आम्ही बोलून एखादी बाईक, सायकल मिळते का याची चौकशी करत होतो. मात्र, पुवर्तीमध्ये जायचे म्हटल्यावर एकसारखाच अनुभव! पुवर्ती नाव ऐकताच सगळेच दचकले. त्यांच्या दचकण्यात भीती नव्हती तर कुतूहल होते. अखेर, मदतकार्य पोहोचवण्यासाठी जातो आहोत म्हटल्यावर अनंत विनंतिनंतर एक ट्रॅक्टर मिळालाच. आम्ही कशासाठी आलो त्याशी त्यांना काही देणेघेणे नव्हते. बस्स, "लेके चलते है" हे त्यांचे वाक्य एकीकडे दिलासा देणारे आणि दुसरीकडे संशय निर्माण कारणारे होते. खरे सांगायचे तर आमच्याकडेही पर्याय नव्हता. अंतर जेवढे वाटले त्यापेक्षा जास्तच होते आणि पायदळ चालणे म्हणजे प्रचंड उशीर आणि सूर्यास्त होऊन चंद्र उजाडण्याचा विषय होता. शिवाय, ट्रॅक्टरच या मार्गांवरचा सच्चा बंदा, हे खरे होते. टेकलगुरम या गावापर्यंत आमचा प्रवास म्हणजे अगदी जंगल सफारीसारखाच होता. याच गावाच्या वेशीवर सीआरपीएफचे कॅम्प आहे आणि तिथेच आम्हाला अडवलं गेलं. आणि इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती झाली. तेथील पाहरेदारान जोरात आमचे सगळे गुपित चव्हाट्यावर आणले आणि आमचा जीव बऱ्यापैकी धोक्यात आला होता. कॅम्प बाहेर असलेले गावकरी आणि ट्रॅक्टरवाला आमच्याकडे वेगळ्याच नजरेनं बघायला लागले होते. अशात कॅम्प मधील वरिष्ठांना ही बाब कळली आणि त्यांनी वेळ साधून नेत सगळी स्थिती वाचाचलाखीनं हाताळली. मात्र, ट्रॅक्टरवाला आता अलर्ट झाला होता आणि तो सोबत येण्यास अजिबात तयार नव्हता. शेवटी कॅम्प प्रमुखांनच त्या ट्रॅक्टरवाल्याला पुवर्ती कॅम्पला नेण्याचे आदेश दिले. सीआरपीएफच्या त्या वरिष्ठ अधिकार्यांकना आम्ही तिथे कशासाठी आलो त्यापेक्षा गावकरण्यांनी आम्हाला दिलेल्या ट्रॅक्टरचे जास्त कौतुक होते. त्याचे कारण म्हणजे, पोलिसांना इथल्या गावांतून कसलीही महत उपलब्ध होत नाही. साधे पाणी पाजले जात नाही, तेथे आम्हाला ट्रॅक्टर मिळाले होते आणि म्हणूनच आम्हीही त्याच्या संशयाच्या भोवर्याात अडकलो होतो. आता त्यांना काय सांगावं की आम्ही कसे कसे तिथवर पोहोचलो ते... तेथून ६ किमी अंतरावर पुवर्ती हे गाव. अत्यंत खोलात असलेलं पुवर्ती हे जहाल माओवादी माडवी हिडमा याचं गाव आणि हेच गाव त्याच्या कुकृत्याचं गढ मानलं जातं. याचा अर्थ गावकरीही माओवादीच आहेत, असं मुळीच नाही. कुऱ्हाड आणि बंदूकीच्या गोळीच्या भितीपोटी नाईलाजाने या क्षेत्रातील अनेक गावकरी त्याला बांधिल झाले आहेत. माडवी हिडमा हा नक्षल्यांच्या (माओवाद्यांच्या) प्लाटून क्रमांक १ चा कमांडर. प्लाटून क्रमांक १ म्हणजे सगळ्यात घातक मानली जाते आणि त्याचा कमांडर म्हणजे माओवाद्यांच्या प्रत्यक्ष कृतींसाठी तोच जबाबदार असतो. एका अर्थाने तोच प्रमुख! कसेतरी पुवरतीला आम्ही पोहोचलो आणि मुसळधार पावसाने जोर धरला. आणि सारेच चिंब भिजलो होतो. अशा दुर्गम जंगली भागात पावसाचा आनंद न्याराच आणि त्यात भिजणे म्हणजे बातच न्यारी. पुवर्तीच्या अगदी जवळच रस्ता कामासाठी आणलेला पोकलेन माओवाद्यांनी महिनाभरापूर्वीच जाळला असल्याचे दिसून आले. त्याही पूर्वी महिन्याभरापूर्वीच एक सीआरपीएफ व्हॅन भुसुरुंग स्फोटात नेस्तनाबूत झाल्याचे अवशेष आम्ही बघितले. यात दोन जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. खरे सांगायचे तर हा रस्ता गावकर्यां साठीच बनवायला घेतला आहे. मात्र, माओवाद्यांना विशेषतः कमांडर माडवी हिडमा यालाच नको आहे. कारण, हा रस्ता तयार झाला तर गावकरी शहराकडे धाव घेतील आणि विकास, आरोग्य सेवा जवळ होतील. शिवाय पोलिसांना पुवर्ती हे गाव सहज आणि सोपे होईल. पुवर्तीला सीआरपीएफ कॅम्प मध्ये पोहोचलो. त्यांना आम्ही आल्याची वार्ता आधीच्या कॅम्पमधून आधीच मिळाली असावी! त्यांनी लागलीच आम्हा सगळ्यांना आत घेतले. चहा-पाणी दिले गेले आणि तेथील प्रमुखांनी आम्हाला आता परत जाने धोक्याचे असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्याकडून सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही पुवर्ती गावात पोहोचलो. तेथे एकही गावकरी आमच्याशी बोलला तयार नव्हता. सारेच संशयाने बघत होते. फोटो, विडिओ घेणे धोक्याचे असल्याचे आधीच कळले होते. त्यामुळे, आम्ही तो शहाणपणा टाळला आणि परतीला लागलो. पुन्हा पुवर्तीच्या सीआरपीएफ कोब्रा कॅम्प प्रमुखांनी आम्हाला थांबण्याचा आग्रह धरला. परंत, आमची गाडी आणि काही सदस्य डांबरी रस्त्यावरील कॅम्पजवळ थांबल्याने त्यांनी काळजी न करण्याचे सांगत, कसलीही अडचण आली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा धीर देत, एक संकेत दिला. “बारीश आपके सुरक्षा के लीये दौड के आयी है। फिर भी कूछ लगे तो हम है। “ आम्ही हसलो, हस्तांदोलन केले आणि परतीला लागलो... पावसाळी नद्या, नाले तुडूंब भरले होते. मात्र, स्थानिक आदिवासी आणि ट्रॅक्टर जिंदाबाद! आम्ही शेवटच्या नाल्यापर्यंत पोहोचलो आणि जे कळले ते भयाण होते. मात्र, काही गोष्टी न संगीतलेल्याच बर्याे असतात. एवढच की एवढ्या धोक्यातूनही आम्ही सहीसलामत बाहेर पडलो आणि घटनेचा खरा बाज बाहेर आणला. थॅंक्स फॉर heavy rain आणि आमचे नशीब!
--------------------------
*सोयम धुरवा सीताराम आणि सोयम शंकर या भावंडांना का मारले?*
- साधारणत: ७-८ ऑगस्ट २०२४ रोजी पूवर्तीमध्ये माडवी हिडमा याच्याच चिथावणीवरून २५-२६ वर्षीय तरुण ओयम सीतारामची (सोयम धुरवा सीताराम) हत्या माओवाद्यांनी केली होती. त्याचा दोष इतकाच होता की तो त्याच्या गर्भवती पत्नीला वेळेवर उपचार मिळावा, ही त्याची इच्छा होती. ३१ जुलै किंवा १ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळसकाळी सीतारामची पत्नी पडल्याने ती जखमी झाली होती आणि ते शुद्ध हरपण्याच्या स्थितीत होती. दुपारपर्यंत कसलेच उपचार गावात मिळू शकत नसल्याने आणि तेवढी सोय नसल्याने त्याने अखेर पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, ते उपचार पुरेसे नव्हते. तेथील डॉक्टरांनी तिला मुख्य दवाखान्यात नेण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार तीला मोठ्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. परंतु, वाटेतच ती दगावली. स्वाभाविकच सीताराम आणि त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, त्याच्या कुटुंबावर आलेल्या संकटांची ही ओयम पोलिसांकडे गेलाच कसा, असे म्हणत त्याला पोलिसांचा खबरी ठरवून त्याची हत्या करण्यात आली. ओयमने पूवर्ती येथीलच मुलीशी प्रेमविवाह केला होता. ओयमचे घर तसे सुशिक्षित आणि घरची स्थिती बरीच. त्याचाही राग माडवी हिडमाला होता. कारण, शिक्षण घेणे, सरकारातील माणसांशी बोलणे म्हणजे गुन्हा हा भारतातील माओवादाचा पहिला धडा. त्याच कारणाने ओयम आणि त्याचे कुटूंब दंतेवाडा येथील वालनाडमध्ये स्थायिक झाले होते. परंतु, पत्नी गर्भवती असल्याने ती माहेरी आली होती आणि त्याचमुळे आयेमही पूवर्तीला होता. या दुर्दांत घटनेनंतर १३ ऑगस्टला ओयमच्या पत्नीची तेरवी होती. त्यासाठी ओयमचा लहान भाऊ १६ वर्षीय स्वयंम शंकर पूवर्तीला शालेय गणवेषात आला होता. तो शालेय गणवेषात गावात दाखलच कसा झाला, या रागावरून हिडमाच्या चिथावणीवरून स्वयंमलाही दांड्यांनी मरेस्तोवर मारहाण करण्यात आली. पाचच दिवसाच्या अंतरात दोन्ही भावांची हत्या करून माओवाद्यांनी आपल्या भेसूर हास्य दर्शन घडवले आहे. खरे सांगायचे तर दुर्गम पुवर्तीमध्ये आरोग्य आणि पायाभूत सुविधा पोहोचवणे सोपे व्हावे तसेच या गाववरून माओवाद्यांचा प्रभाव कमी व्हावा, यासाठी तेथे सीआरपीएफच्या कोब्रा बाटलीयनचे कॅम्प उभारण्यात आले आहे. जिथे सेना तिथे भारतीय अस्मितेचा मान आणि भान देणारा राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकणारच. सेनेच्या वतीने काहीच दिवसांपूर्वी पुवर्तीमध्ये प्रथमच तिरंगा फडकावण्यात आला होता. जिथे तिरंगा तेथून दमांकर्यां ना पळ काढावा लागतो आणि लालसलाम निकामी होते. त्याचा राग म्हणच सीताराम आणि शंकर यांच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत. पुवर्तीपर्यन्त रस्ता बनवण्याचे कार्य सुरू आहे. या कार्याला रोखण्यासाठी पोलीस वाहनांना भुसुरुंग लावून उडवणे, पोलिसांच्या हत्या करणे, मशीनरी नेस्तनाबूत करणे असे प्रकार तिथे सुरू असल्याचे प्रकर्षाने जाणवते. स्फोटात परखच्चे उडालेले वाहनांचे अवशेष या क्रूर कृत्यांची प्रचीती देणारे ठरते.
- *प्रवीण खापरे*
(शोधयात्रेतील सदस्य - दत्ता शिर्के, प्रवीण खापरे, अजिंक्य थेर, शुभम निकम, निखिल खाटबागे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा